शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

(गणेशोत्सवादी निमित्त विशेष) तळलेले मोदक

रवा
साहित्पारीसाठी: एक वाटी बारीक रवा, एक वाटी मैदा, तीन टे. स्पून कडकीत तुपाचं मोहनं, चिमूटभर मीठ, थोडं दूध, पाणी, तळण्यासाठी तूप किंवा रिफाईंड तेल.

NDND
सारणासाठी : तीन वाट्या किसलेलं सुकं खोबरं, एक वाटी बारीक रवा किंवा जाडसर कणीक, पाव वाटी तूप, अडीच वाट्या पिठीसाखर, एक टे.स्पून भाजलेली खसखस, पाव वाटी काजूचे तुकडे किंवा चारोळी, एक टी.स्पून वेलचीपूड.

कृती : प्रथम सारण करून घ्यावं. सुकं खोबरं मंद आचेवर कोरडंच गुलाबी भाजांव. कणीक किंवा रवा तुपावर खमंग भाजावा. गार झाल्यावर दोन्ही एकत्र करून त्यात इतर सर्व साहित्य मिसळावं आणि सारण तयार करावं.

पारीसाठी दिलेला रवा-मैदा एकत्र करून त्यात मीठ आणि तुपाचं मोहन घालून जरूरीनुसार दूध-पाणी वापरून अगदी घट्ट पीठ मळावं. हे पीठ पाऊण-एक तास झाकून ठेवावं. नंतर हे पीठ हलके हलके कुटून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून पुर्‍या लाटाव्यात. त्यात खोबर्‍याचं सारण भरून मोदक करावेत आणि तुपात/तेलात तळावेत.

मोदक जेवढे लहान आकाराचे असतील तेवढे सुबक दिसतात. तळताना मंद आचेवर, मुखर्‍यांवर झार्‍याने तूप किंवा तेल उडवून तळावेत म्हणजे टोकाकडे मोदक कच्चा राहत नाही.
उपवासाचे मोदक