Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धारावीत ५२ हजारांहून अधिक विलगीकरणात

Updated: रविवार, 19 एप्रिल 2020 (13:19 IST)
 
करोनाचा संसर्ग वाढू नये याची खबरदारी म्हणून धारावीतील ३४ प्रतिबंधित विभागांमधील तब्बल ५२ हजारांहून अधिक व्यक्तींना घरात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
 
धारावीत १६ नवीन रुग्ण आढळले असून येथे आतापर्यंत करोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचे रुग्ण आढळलेल्या धारावीतील इमारती आणि परिसर असे मिळून ३४ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आले आहेत. येथे तब्बल ५२ हजार ८०० नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यत आली आहे. पालिकेने धारावीमधील घरोघरी नागरिकांची तपासणी करण्यासाठी नेमणूक केलेल्या पथकांनी आतापर्यंत ४० हजार नागरिकांची तपासणी केली असून २२३ नागरिकांच्या चाचण्या करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
 
येथील लोकं घराबाहेर पडू नये म्हणून या परिसरातील नागरिकांना दररोज सकाळी आणि रात्री प्रत्येकी जेवणाच्या पाकिटांचे वितरण, विविध धान्य आणि आवश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या पाकिटांचे वाटप तसेच गरजवंतांना औषधांचाही पुरवठा करण्यात येत आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

३ सप्टेंबरपासून मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान दररोज एक नवीन ट्रेन धावणार

LIVE: मुंबईत रेल्वेने रीलबाजांवर कारवाई करत १० गुन्हे दाखल केले

धावत्या ट्रेनमध्ये दिवा लावून पूजा करणे महागात पडले; रेल्वेने प्रवाशाला बाहेर काढले

आईच्या जिद्दीला सलाम! मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी मॅरेथॉन धावली आणि जिंकली

अमेरिकेच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात इराणवर १२ जण ठार

पुढील लेख