शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : सोमवार, 11 एप्रिल 2022 (17:29 IST)

मुंबईत ऑफिस मध्ये विषारी साप घुसला

naag
सापाचे नाव घेतले की अंगावर काटा येतो. आणि जर साप समोर आला तर काय होणार? मुंबईच्या नाला सोपारा येथील एका कार्यालयात खुर्चीवर एक विषारी साप येऊन बसला. सापाला पाहून कार्यालयातील सर्व हैराण झाले.  या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. नालासोपाराच्या पूर्व सेंट्रल पार्क कॉम्प्लेक्सच्या कार्यालयातील ही घटना आहे. साप ऑफिस मध्ये शिरला तेव्हा ऑफिस मध्ये कोणी नव्हते. सुदैवाने कोणाला काही हानी झाली नाही.  या घटनेचे व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेवर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पहिल्यांदा हा साप ऑफिसच्या कार्पेट जवळ दिसला नंतर तो चक्क खुर्चीवर जाऊन बसला. सापाच्या प्रत्येक हालचाली सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहे. घडलेला प्रकार पाहून सर्वाना आश्चर्य झाले आहे.