मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात 16 वर्षे जुन्या प्रकरणात अटक वॉरंट जारी
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वारंट जरी केले आहे. हे अटक वॉरंट 16 वर्ष जुन्या प्रकरणात जारी केले आहे. हे प्रकरण निलंगा शहरात 2008 मध्ये भडकाऊ भाषण केल्याच्या या प्रकरणात राज ठाकरे पूर्वी देखील न्यायालयात हजर झाले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी उदगीर मोडवर परिवहन महामंडळाच्या बस पेटवून दिल्या.या प्रकरणी निलंगा शहर पोलीस ठाण्यात मनसे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा खटला निलंगा न्यायालयात 2008 पासून खटला सुरु आहे. राज ठाकरे यांनी न्यायालयाच्या प्रत्येक तारखेला हजर राहण्यास असमर्थता जाहीर केली त्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला मात्र आता त्यांनी दिलेल्या तारखेला हजर न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
या प्रकरणी सर्व आरोपींना जमीन मिळवण्यासाठी आरोपींच्या वकिलांनी जमीन अर्ज दिला मात्र न्यायालयाने हजर न झाल्यामुळे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते. 30 ऑगस्ट रोजी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने नवीन दंड ठोठावला असून त्यांचा जामीन मंजूर केला आता या प्रकरणी राज ठाकरेंना न्यायालयात हजर राहावं लागणार. या नंतर त्यांना जामीन मिळणार.
Edited By - Priya Dixit