बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (11:12 IST)

राज्यातील कर्मचाऱ्याच्या प्रमुख संघटना संपावर ठाम

कामगार, कर्मचारी आज होणाऱ्या संपात सहभागी होण्यावर राज्यातील कर्मचाऱ्याच्या प्रमुख संघटना ठाम असून सरकारच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. दुसरीकडे संपात सहभागी झालात तर शिस्तभंगाची कारवाई करु आणि त्या दिवशीचा पगारही मिळणार नाही असे राज्य सरकारने बजावले आहे.
 
केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचारी व कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी या लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, विविध महामंडळांमधील कर्मचारी संघटना, शिक्षकांच्या विविध संघटना तसेच राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटेने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे आणि सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्र विश्वास काटकर यांनी ही माहिती दिली. कर्मचारी मोठ्या प्रमाणात या संघटनांचे सदस्य आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघ संपात नसेल पण त्यांनी मागण्यांना पाठिंबा दिला आहे. आमचाही मागण्यांना पाठिंबा आहे पण आमच्या संघटनेचे सदस्य काळ्या फिती लावून काम करतील असे सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने म्हटले आहे.