रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (16:09 IST)

पोलिसाकडून अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

पोलिसांच्या प्रतिमेला काळिमा लावणारी घटना डोंबिवलीत घडल्याचे धक्कादायक वृत्त मिळाले आहे.पोलीस कर्मचाऱ्यानेच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.सदर आरोपी कल्याण-डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
 
डोंबिवलीत एका इमारतीत राहणाऱ्या या अल्पवयीन तरुणीचा जिना चढत असताना आरोपीने विनय भंग केला.या तरुणीने या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली रामनगर पोलिसांनी 354 कलमांतर्गत त्याचा वर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
 
आरोपीला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयातून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.त्याच्या विरोधात निलंबन कारवाई  करण्याची मागणी केली जात आहे.या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली भागात खळबळ उडाली आहे.