सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (07:51 IST)

मनसेच्या कार्यकर्त्यांनी महिलेला मारहाण केली आहे

manse
सध्या गणेशोत्सव सुरू असून, सर्वत्र पक्षाचे बॅनर लावले जात आहे. मात्र या बॅनर लावण्यावरून  मुंबईच्या मुंबादेवी परिसरात . मनसेच्या कार्यकर्त्यांनी महिलेला मारहाण केली आहे. प्रकाश देवी असे पीडित महिलेचे नाव असून, त्यांच्या मेडीकलसमोर मनसेचे कार्यकर्ते खांब उभे करून बॅनर लावत होते. तेव्हा महिलेने या बॅनर लावण्याला विरोध केला असता, तिला मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबादेवी परिसरात प्रकाश देवी यांचे मेडिकल आहे. या मेडिकलसमोर मनसेचे कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या बॅनरसाठी खांब रोवत होते. हे खोदकामा मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे आणि त्यांचे साथीदार बल्ली रोवत होते. मात्र, त्यावेळी मेडिकलसमोर होत असलेले खोदकामा करण्याला प्रकाश देवी यांनी विरोध केला. त्यानंतर मनसेच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी विरोध करत असल्यामुळे त्या वृद्ध महिलेच्या कानशिलात लगावली. तसेच, तिला धक्काबुक्की केली.
मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीत ही महिला दोन वेळा खाली पडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मनसेचे मुंबादेवी परिसरातील विभाग प्रमुख विनोद अरगिळे यांनी पीडित महिलेला मारत असल्याचे दिसत आहे.