गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जून 2021 (09:07 IST)

धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी एकाला अटक

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल आल्यानंतर खळबळ माजली होती. यानंतर संपूर्ण मंत्रालायाची तपासणी करण्यात आली आहे. धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. 
 
मंत्रालयात बाँम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल पुण्यातून आल्याचं स्पष्ट झालं आहे. शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शैलेश शिंदे याच्या मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही. या कारणामुळे म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला, असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
 
मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून तपास सुरु
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल पाठवल्याप्रकरणी पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या  शैलेश शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. शैलेश शिंदे यानं  पाठवलेला मेल सांयकाळी 6.20 ला  प्राप्त झाला होता अशी माहिती आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.