सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (13:37 IST)

लालबागच्या राजाच्या दरबारात सर्व सामान्यांशी असभ्य वर्तन, व्हिडिओ व्हायरल

lalbagcha raja
लालबागच्या राजाच्या दरबारात दररोज भाविक दर्शनाला येतात. लाखो लोकांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. हे पंडाल सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय आहे. या ठिकाणी दरवर्षी पंडालच्या सुरक्षाकर्मींकडून सर्वसामान्य माणसाशी गैरवर्तन केले जाते. तर व्हीआयपी लोकांना मान दिला जातो. यंदाच्या वर्षी देखील भाविकांशी गैर वर्तन केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर  भक्तांशी भेदभाव करणाऱ्या प्रसिद्ध गणपती पंडालवर टीका केली जात आहे. 

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात व्हीआयपी आणि सर्वसामान्य भाविकांना अशी वागणूक का दिली जाते, असा सवाल नागरिक करत आहेत. तर देवासमोर सर्व समान आहेत. 

एका व्हिडीओ मध्ये भाविक लांबून येऊन तासंनतास  रांगेत उभे राहतात आणि आपली पाळी येण्याची वाट बघतात. देवाच्या पुढे आल्यावर त्यांना नीट दर्शन न करू देता सुरक्षाकर्मी त्यांना ढकलून देतात आणि एखादा व्हीआयपी आल्यावर त्यांना फोटो काढू देतात. थांबू देतात असा भेदभाव का? असा प्रश्न अब्जाधीश उद्योगपती हर्ष गोयंका यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून भाविकांना मिळणाऱ्या असमान वागणुकीवर टीका केली असून ते म्हणाले, लालबागचा राजा कडे व्हीआयपी दर्शन का होतात. सर्वसामान्य भाविकांना एवढा मनस्ताप होतो. त्यांच्याशी अभद्र व्यवहार का केला जातो.  

एका युजरने या वर प्रतिक्रिया देत म्हटले आहे, या पंडालला व्हीआयपी पंडाल घोषित करून द्यावे जेणे करून लांबून भाविक येथे येणार नाही. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहून देखील त्यांना बाप्पाचे दर्शन नीट करू देत नाही. ढकलतात. अशी वागणूक योग्य नाही. 
Edited by - Priya Dixit