रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2024 (12:21 IST)

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

team india
टी20 विश्व कप विजेता भारतीय क्रिकेट टीम गुरुवारी ओपन बसमध्ये रोड शो करणार असून नंतर वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित समारंभात टीम चा सत्कार केला जाणार आहे. 
 
भारतीय टीम श्रेणी चारच्या वादळामुळे तीन दिवस बारबाडोस मध्ये अडकले होते. यानंतर बुधवारी ग्रांटली एडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विशेष विमान व्दारा दिल्ली पोहचली. 
 
एयर इंडियाचे विशेष विमान एआयसी 24 डब्ल्यूसी स्पेशल चारटेडफ्लाईट ने त्यांना दिल्लीला पोहचवले. विमानामध्ये भारतीय टीम, सहयोगी स्टाफ, खेळाडूंचे कुटुंबीय आणि भारतीय क्रिकेट बोर्डचे अधिकारी तसेच भारतीय मीडियाचे काही सदस्य होते. या विशेष उड्डाणाचे नियोजन बीसीसीआय ने केले होते. 
 
भारतीय टीम संध्याकाळी चार वाजता मुंबई पोहचणार आहे. त्यानंतर ओपन बस मध्ये दोन तास रोड शो करणार आहे. त्यानंतर भारतीय टीम वानखेडे स्टेडियम पोहचणार आहे. 
 
खेळाडू आणि टीमच्या सदस्यांचा सन्मान करणार आहे. सन्मान कार्यक्रम संध्याकाळी सात ते साडेसात दरम्यान होणार आहे. यांनतर सर्व खेळाडू आपल्या हॉटेलमध्ये रवाना होतील.