मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 14 जून 2021 (14:29 IST)

कंत्राटदाराला घातली कचऱ्याने आंघोळ, शिवसेना आमदाराचे प्रताप

मुंबई पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे ‘तुंबई’ बनली. या दमदार पावसामुळे मुंबईमधली नालेसफाईचे बिंग फुटले असून, संपूर्ण नालेसफाई झाली असल्याच्या मुंबई महापालिकेच्या दाव्याला देखील याने हरताळ फसला गेला आहे. त्यामुळे, विरोधकांनी महापालिकेत सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे.
 
यातच मुंबईमधील कुर्ला परिसरात शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी एक घृणास्पद कृत्य केले असून, एका कंत्राटदाराला त्यांनी चक्क कचऱ्याने अंघोळ घातलेली आहे. याचा व्हिडीओ आता समाज माध्यमांवरून प्रचंड व्हायरल होत असून, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण न झाल्याने संतापून त्यांनी या ठेकेदाराला नाल्याजवळ बसवून त्याला कचऱ्याने अंघोळ घातली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वच स्तरांवर उमटले असून, शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी देखील या घटनेची निंदा केली आहे.
 
दरम्यान, या सर्व प्रकरणावर लांडे यांना विचारणा केली असता, “ज्या लोकांनी मला विश्वासाने मला निवडलंया आहे. त्यांचा मी विश्वासघात करू शकत नाही. माझ्या भागात पाणी अशा प्रकारे जर पाणी तुंबले, तर मी स्वत: गटारात उतरुन काम करेन. मात्र, लोकांना कुठला त्रास नको यासाठी मी आणि पक्षातील काही कार्यकर्ते हे काम करत आहोत,” असं सांगत तयांनी या कृत्याचं समर्थ केलं आहे.