शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (21:01 IST)

मुंबईत स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या शंभरच्या वर

swine flue
मुंबईमध्ये  महिनाभरात स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या शंभरच्या वर गेली असून रुग्णांची संख्या वाढतच आहे. तर गेल्या महिन्याभरात मलेरीयाच्या रुग्णांचा आकडा पाचशेच्या वर गेली आहे. तर गॅस्ट्रो आजाराच्या रुग्णांची संख्या तर सहाशेच्या वर गेलेली आहे. यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून गेल्या एक महिनाभरातील  रुग्णांचा  आकडा जाहीर करण्यात आला आहे.
 
जुलै महिन्यातील रुग्णांची आकडेवारी
 
मलेरीया - ५६३, लेप्टो - ६५, डेंग्यू - ६१, गॅस्ट्रो - ६७९, हॅपटीटीस - ६५, चिकुणगुनया - २, स्वाईन फ्लू - १०५
 
दरम्यान एकाही रुग्णाचा कोणत्याही आजारामुळे मृत्यू झालेला नाही. जून महिन्यात स्वाईन फ्लूचे केवळ दोन रुग्ण आढलेले. तर मलेरीयाचे जूनमध्ये ३५० रुग्ण होते. दरम्यान मलेरीया आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. मुंबई महापालिकेनेदेखील नागरिकांसाठी मार्गर्दशक सूचना जारी केल्या आहेत.
 
स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी महापालिकेच्या सूचना
 
* शिंकताना आणि खोकताना नाक रुमालाने किंवा टिश्यूने झाका
 
* आपले हात वारंवार साबण आणि पाण्याने धुवा
 
* आपले डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
 
* डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका आणि जवळच्या महापालिकेच्या आरोग्य पोस्ट/दवाखाना/रुग्णालयाचा त्वरित सल्ला घ्या
 
* उच्च ताप, श्वास घेण्यास त्रास किंवा त्वचेचा किंवा ओठांचा निळा रंग पडल्यास उपचारासाठी डॉक्टरांकडे जा
 
* उपचारास विलंब होऊ नये कारण यामुळे गुंतागुंत निर्माण होते आणि मृत्यूचा धोका असतो
 
* डेंग्यू, मलेरिया रोगांच्या प्रतिबंधासाठी सल्ला
 
* डास चावण्यापासून दूर राहण्यासाठी बेड नेट, खिडकीचे पडदे आणि संपूर्ण कपडे वापरण्याचा सल्ला
 
* परिसर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा
 
* विषम वस्तू जसे की टिन्स, थर्माकोलचे बॉक्स, नारळाची टरफले, टायर, न वापरलेले सामान इत्यादी साफ करून अळ्यांच्या प्रजननास प्रतिबंध करा
 
* गॅस्ट्रो, हिपॅटायटीस, टायफॉइड रोगांच्या प्रतिबंधासाठी सल्ला
 
* रस्त्यावरील अन्न सेवन टाळा
 
* अन्न सेवन करण्यापूर्वी हात धुणे किंवा स्वच्छता करणे आवश्यक आहे