शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|

छट पुजा म्हणजे तरी काय?

NDND
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर टीका करताना त्यांच्या छट पूजेवरही टीका केली. छट पूजेचा उपयोग राजकीय शक्तीप्रदर्शनासाठी होत असून त्याद्वारे मराठी लोकांना उकसविण्याचे प्रकार होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांनी टीका केलेली छट पूजा म्हणजे नेमके असते तरी काय याची ही माहिती.

छट पूजा हा बिहारमधील एक पारंपरिक सण आहे. हा सण वर्षातून दोनदा साजरा केला जातो. उन्हाळ्यात चैती छट तर दिवाळीनंतर आठवडाभरात कार्तिक छट साजरा केला जातो. यात कार्तिकी छट विशेष लोकप्रिय आहे. कारण या सणासाठी २४ तास उपवास ठेवावा लागतो. उपवासात पाणीही पिण्याची परवानगी नसते. त्यामुळे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात तो करणे लोक जास्त पसंत करतात.

छट पूजा ही प्रामुख्याने सूर्याची पूजा आहे. अंग देशाचा राजा कर्ण (आताचा बिहारमधील भागलपूर जिल्हा) सूर्यपूजक होता. त्यानंतर ही परंपरा सुरू झाली. बिहारी लोक जिथे गेले तिथे त्यांनी ही प्रथा नेली. छटपूर्वी घर व परिसर अगदी स्वच्छ केले जाते. त्यादिवशी सर्वसाधारणपणे नदीत पवित्र स्नान केले जाते ाणि सूर्याची पूजा केली जाते. दोन वेळा ही पूजा केली जाते. एकदा ही पूजा सायंकाळी आणइ त्यानंतर रहाटे केली जाते. प्रामुख्याने नदीच्या किनार्‍यावर किंवा जलाशयावर ही पूजा करतात.

छट पूजा एखाद्या उत्सवासारखी साजरी केली जाते. उपवास करणार्‍यांना मोठा मान असतो. विशेषतः घरातील अधिकाराने मोठ्या असलेल्या स्त्रिया आवर्जून हे व्रत करतात. उपवास सोडताना मोठा जल्लोष असतो. बाहेरील अनेक लोकही आवर्जून त्यासाठी हजेरी लावतात. या दिवशी लोकसंगीताचा कार्यक्रम होतो. यातील गाणीही परंपरागतरित्या चालत आलेली असतात. बिहार व उत्तर प्रदेशातील सामाजिक स्थिती, संस्कृती आणि पौराणिक परंपरा यावर भाष्य करणारी असतात.

आता छट पूजेत नवीन गाणीही आली आहेत. त्याच्या अनेक कॅसेट्सही येतात.