शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गर्भवती महिलांसाठी नवीन अभियान

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 22 व्या भागातून देशबांधवांशी संवाद साधला आहे. त्यांनी रियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार्‍या खेळाडूंचा उत्साह वाढवला. शिवाय पावसाळ्यात होणार्‍या आजारांविषयी त्यांनी लोकांना सजग केले. तर, गर्भवती महिलांसाठी एक नवीन अभियानही त्यांनी जाहीर केली आहे. मोदी यांनी पहिल्यांदा 3 ऑक्टोबर 2014 रोजी जनतेसोबत रेडियोव्दारे मन की बात केली होती. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाचा गर्भवती महिलांनी लाभ घ्यावा.
 
मोदी म्हणाले..
 
* दरवर्षी 3 कोटी महिला या गर्भवती असतात.
* प्रसूतीच्या काळात कित्येक महिलांना प्राण गमवावे लागतात.
* माता मृत्यूचा दर घटला असला तरी, समाधानकारक नाही.
* आपण अजूनही कित्येकांचे जीव वाचवण्यात अपयशी ठरत आहोत.
* सरकारने काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान सुरू केले आहे.
* शहरी व ग्रामीण भागातील महिलांनी या अभियानाचा लाभ घ्यावा.