रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (17:28 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

माझे बंधु आणि भगिनी यांस, 
कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये उद्‌भवलेली परिस्थिती अतिशय दु:खद आहे. या घडामोडींचे मला व्यक्तिश: दु:ख झाले आहे. हिंसा हे कोणत्याही समस्येचे समाधान असू शकत नाही. लोकशाहीमध्ये संयम आणि परस्पर चर्चेच्या माध्यमातून कोणत्याही समस्येचे समाधान शक्य आहे. 
 
कायद्याच्या कक्षेत राहून या वादावर तोडगा काढता येईल. त्यासाठी कायदा मोडणे, हा उपाय नाही. गेल्या दोन दिवसात सुरू असलेली हिंसा आणि जाळपोळीमुळे केवळ गरीबांचे नुकसान झाले आहे, आपल्या देशाच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. 
 
आजतागायत देशावर कधीही विपरित परिस्थिती ओढवली असता देशातील इतर नागरिकांप्रमाणेच कर्नाटक आणि तमिळनाडूमधील नागरिकांनीही संवेदनशीलतेचे यथार्थ दर्शन घडविले आहे. दोन्ही राज्यांमधील नागरिकांनी संवेदनशीलपणे वागावे आणि आपल्या नागरी कर्तव्यांचे स्मरण करावे, असे मी आवाहन करतो. आपण देशहीत आणि देशनिर्मितीला सर्वोच्च प्राधान्य द्याल आणि हिंसा, तोडफोड आणि जाळपोळ करण्याऐवजी संयम, सद्‌भावना आणि समाधानाला प्राधान्य द्याल, असा विश्वास मला वाटतो.