शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 10 ऑगस्ट 2016 (11:18 IST)

प्रसुती रजा 26 आठवडे!

प्रसुती रजा वाढीचं विधेयक संसदेत आज सादर होणार आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकरदार महिलांना प्रसुती रजा आता 26 आठवड्यांची करण्यात येणार आहे.
 
कामगार कायद्यानुसार प्रसुती काळात महिला नोकरदारांना सध्या 12 आठवड्यांची भरपगारी रजा मिळते. त्यात वाढ करून साडेसहा महिन्यांची करण्यास कामगार मंत्रालयाने तयारी दर्शविली आहे. प्रसुती आणि त्यानंतरच्या काळात अपत्याच्या दैनंदिन पालनपोषणासाठी मातेला दिल्या जाणाऱ्या रजेत वाढ करून, ती साडेसहा महिन्यांची करण्याबाबतचे लेखी पत्र कामगार मंत्रालयाला पाठवण्यात आले होते. त्यास कामगार मंत्रालयानेही सहमती दर्शविली आहे.