सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारतास चीनचा विरोध नाही : स्वराज

नवी दिल्ली- भारताच्या आण्विक इंधन पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वास चीनचा विरोध नसल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी केले. केवळ या गटामधील भारताच्या सदस्यत्वासंदर्भातील पात्रता प्रक्रियेसंदर्भात चीन आग्रही असल्याचे स्वराज यांनी स्पष्ट केले.
 
भारतास याच वर्षी एनएसजीचे सदस्यत्व मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे परराष्ट्रमंर्त्यांनी पत्रकार परिषदेस संबोधित करताना सांगितले. भारताच्या एनएसजी सदस्यत्वास चीनचा विरोध नसून भारताचाही पाकिस्तानच्या एनएसजी सदस्यत्वास विरोधएनएसजी करार नसल्याची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
 
एनएसजीचे सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी या आठवडय़ात चीनचा दौरा केल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. 
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी जयशंकर यांच्या या दौर्‍यासंदर्भात माहिती देताना जयशंकर यांच्या या दौर्‍यामध्ये एनएसजीसहच इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.