विलुप्त झाल्या 220 भाषा...
वडोदरा स्थित भाषा रिसर्च ऍड पब्लिकेशन सेंटरने केलेल्या संशोधनात हे आढळून आले आहे की मागील पाच दशकांमध्ये किमान वीस टक्के भाषा विलुप्त झाल्या आहेत. सर्वेक्षणाशी निगडित लेखक आणि प्रमुख समन्वयक गणेश देवी यांचे म्हणणे आहे की 1961मध्ये देशात 1100 भाषा होत्या ज्यातून आता किमान 220 आता विलुप्त झाल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार हे सर्वे करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक वेळ लागला. पीपुल्स लिंगुस्टिक सर्वे ऑफ इंडिया (पीएलएसआय) नावाच्या या सर्वेक्षणानुसार आतापर्यंत 780 भाषांचा शोध लावण्यात आला असून त्यात 100 भाषा अशा असू शकतात ज्या सर्वेक्षणात सुटून गेल्या असतील. या प्रकारे देशात किमान 880 भाषा अश्या आहेत ज्यांचे अस्तित्व वर्तमानात आहे. डेवीचे म्हणणे आहे की जास्तकरून लुप्त होणार्या भाषा संपूर्ण देशात फिरती करणार्या समुदायाच्या आहे, जे देशातील फक्त 3 ते 4 टक्के लोकांद्वारे (किमान पाच कोटी लोक) बोलण्यात येतात. त्यांचे मत आहे की या भाषांचे लुप्त होण्याचे प्रमुख कारण ओळखीचा अभाव, समुदायांचे विस्थापन, या भाषांना बोलणारे लोकांना आजीविकेसाठी विकल्पाची कमी आणि अल्प विकसित भाषांनाघेऊन सामाजिक अपयश राहिला. त्याशिवाय या भाषांच्या संरक्षणाला घेऊन कुठलीही नीती नसल्यामुळे यांचे विलोपन अजूनच लवकर झाले. वर्ष 1961च्या जनगणनेच्या आधारावर देशात किमान 1652 भाषांचे रेकॉर्ड करण्यात आले होते. नंतर हे माहीत पडले की एकच भाषा या यादीत वेग वेगळ्या नावांनी सामील झाल्या होत्या, नंतर यांची संख्या 1100वर सीमित करण्यात आल्या. वर्ष 1971मध्ये जनगणना सूचीत केंद्र सरकारच्या निर्णयानंतर फक्त 108 भाषांना क्रमबद्ध करण्यात आले होते कारण सरकारने फक्त त्याच भाषांना यादीत स्थान दिले ज्यांना बोलणार्यांची संख्या दहा हजारापेक्षा अधिक होती. या शिवाय, अन्य भाषांना 'अदर्स सेक्शन'मध्ये सामील करण्यात आले. त्यामुळे बर्याच भाषा देखील विस्मृत झाल्या आहेत. पण पीएलएसआयने आपल्या सर्वेत सरकारी मानकानुसार न पाळता इतर सर्व भाषांना क्रमबद्ध केले.साभार : टाइम्स ऑफ इंडिया