बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 जानेवारी 2019 (09:27 IST)

बाप्परे, थंडीमुळे १८ गाईंचा मृत्यू

मध्य प्रदेशमधील आगर माळवामध्ये १८  गाईंचा थंडीच्या गारठ्याने मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी अजय गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व गाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. त्याचा फटका प्राण्यांनानाही बसताना दिसत आहे. या कडाक्याच्या थंडीतच 18 गाईंचा मृत्यू झाला आहे. मृत गाईंना जर कुठला आजार असेल तर त्याची लागण इतर गाईंना होऊ यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. तसेच थंडीचा गारठा कमी होण्यासाठीही उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले.