शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2024 (12:37 IST)

गोव्यामध्ये 2 भावांचा मृत्यू , 24 तासांमध्ये खायचे फक्त 1 खजूर

गोव्यामध्ये दोन भावांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलीस चौकशी करीत आहे. पोलिसांच्या मते, 29 आणि 27 वर्षाच्या भावांचा मृत्यू कैशेक्सिया आणि कुपोषणमुळे झाला आहे. यांची बॉडी घरातच सापडली. या तरुणांची आई देखील बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळली. घरातील हे सदस्य उपवास करीत होते आणि रोज फक्त एक खजूर खात होते. त्यांचा मृत्यू भुकेमुळे झाला असल्याचे समजते. त्यांचे वडील कापड विक्रेता आहे. जे काही कारणांमुळे कुटुंबापासून वेगळे राहत होते. 
 
डॉक्टरांनी मृत्यूचे खरे कारण सांगितले आहे. भुकेने आणि कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचे समजते तसेच बेशुद्ध असलेली तरुणांची आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नंतर त्यांना मानसिक आरोग्य तपासणीसाठी गोवा मेडिकल कॉलेज आणि ह्युमन बिहेवियर इंस्टीट्यूट  मध्ये दाखल करण्यात येईल. बुधवारी या तरुणांचे वडील त्यांना भेटण्यासाठी हरी आले होते. त्यांनी दरवाजा वाजवला पण कोणी उघडला नाही. मग  ते दरवाजा तोडून घरात गेलेत तर, छोटा मुलगा आत खोलीमध्ये मृत अवस्थेमध्ये आढळला. तसेच मोठ्या मुलाची बॉडी जमिनीवर आढळली. तसेच आई बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळली. हे लोक जेवण करायचे नाही यामुळे त्यांना मृत्यू झाला असल्याची माहित मिळाली आहे. 
 
तसेच त्या तरुणांच्या वडिलांनी म्हणजे नजीर खानने सांगितले की, ते आठवड्याच्या सुरवातीला देखील घरी आले होते. पण यांना घरात येऊ दिले नाही. हे लोक कोणाशी बोलायचे नाही त्यातील मोठ्या मुलाचे नाव होते जुबेर खान व लहान भावाचे नाव होते अफान खान तसेच यांच्या आईचे नाव होते रुकसाना खान. तसेच जुबेर खान हा इंजिनियर होता तर लहान अफान खान बीकॉम शिकला होता. तसेच मिळालेल्या माहितीनुसार जुबेरचे लग्न झाले होते. त्याला दोन मुलं देखील होते. पण याची पत्नी सोबत राहत नव्हती. होऊ शकते की, मानसिकरित्या तणावात असतील. हे लोक फक्त एक खजूर खात होते. यामुळे त्यांचा मृत्यू झालायचे समजते. 

Edited By- Dhanashri Naik