बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (09:12 IST)

मोदींच्या रॅलीत स्फोट घडवणाऱ्या 4 दोषींना फाशी

नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील हुंकार रॅलीमध्ये बॉम्बस्फोट घडवल्याप्रकरणी एनआयए कोर्टानं 4 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 8 वर्षांनी या प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
पाटण्यामध्ये ऐतिहासिक गांधी मैदानावर 27 ऑक्टोबर 2013 रोजी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. तसंच पाटणा जंक्शनच्या फलाट क्रमांक 10 वर बॉम्बस्फोटही झाला होता. त्यात सहा जणांचा मृत्यू आणि 80 हून अधिक जण जखमी झाले होते.
 
या प्रकरणी कोर्टानं एकूण 9 जणांना दोषी ठरवलं आहे. त्यापैकी चौघांना फाशिची शिक्षा दोघांना जन्मठेप, दोघांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा तर एकाला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
हैदर अली, नोमान अन्सारी, मुजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज आलम अशी फाशीची शिक्षा सुनावलेल्या दोषींची नावं आहेत.