रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2017 (11:50 IST)

लठ्ठ महिलेवर उपचार: काळजी घेत नसल्याचा आरोप

जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अहमद सध्या आजारी असून सैफी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. या रुग्णालयात तिची व्यवस्थित काळजी घेतली जात नसल्याचा आरोप तिच्या बहिणीकडून केला जात आहे. इमान अहमदची बहिण शायमा सेलिमने यासंबंधी एक व्हिडीओदेखील जारी केला आहे.

14 एप्रिल रोजी रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांनी डॉ मुफझ्झल लकडावाला खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. डॉ लकडावाला यांनी इमानचं वजन कमी करण्याचं आणि ठणठणीत बरी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असल्याचं शायमा सेलिम बोलल्या आहेत.
 
यासंबंधी रुग्णालयाने आपली बाजू मांडली असून आम्ही दोन आठवड्यांपुर्वीच इमान अहमद यांना पुन्हा इजिप्तला परत घेऊन जाऊ शकता असं कळवलं होतं, मात्र तेव्हापासूनच शायमा यांनी हा व्हिडीओ पसरवत डॉक्टरांची बदनामी करत असल्याचं सांगितलं आहे.