झारखंडमध्ये तलाव आणि धरणात बुडून 6 मुलांचा मृत्यू
झारखंडच्या देवघर आणि गढवा जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सहा मुलांचे मृतदेह जलाशयामध्ये आढळले. देवघर मध्ये तीन मुलांचा तलावामध्ये बुडाल्याने तर गढवा मध्ये धरणामध्ये बुडाल्याने तीन मुलांचा मृत्यू झालेला आहे. यासर्वांची ओळख पटून पुढील चौकशी सुरु झाली आहे.
झारखंडसाध्य देवघर आणि गढवा जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सहा मुलांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवघर मध्ये शुक्रवारी सकाळी तीन लहान मुले तलावामध्ये बुडाले होते. तर गढवा मध्ये धरणामध्ये बुडून तीन मुलांचा मृत्यू झालेला आहे.यानंतर सर्वांच्या कुटुंबामध्ये शोककळा पसरली.
देवघर मध्ये तलावात मिळाले मुलांचे मृतदेह-
झारखंडच्या देवघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सकाळी एका तलावामध्ये तीन लहान मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनारायथारी क्षेत्र अंतर्गत डोडिया गावातील एक तलावामध्ये आठ ते नऊ वर्षाच्या लहान मुलांचे मृतदेह आढळले. या मुलांच्या पालकांनी सांगितले की, हे मुले गुरुवारपासून बेपत्ता होती.
गढवा मध्ये धरणात मिळाले तीन मुलांचे मृतदेह-
झारखंडच्या गढवा जिल्ह्यामध्ये शुक्रवारी दुपारी तीन मुले धरणात बुडाली. पोलीस अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार बंशीधर नगर पंचायत क्षेत्राच्या बभनी खंड धरणामधून लहान मुलांचे मृतदेह काढण्यात आले. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Edited By- Dhanashri Naik