शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (14:33 IST)

गुजरातमध्ये पाऊस आणि पुरानंतर 'आसना' वादळाचा धोका, कच्छमध्ये अलर्ट जारी

cyclone
सध्या गुजरातला पावसाने झोडपले आहे. पावसाचा कहर गुजरात मध्ये दिसून येत आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता आसना चक्रीवादळाचा धोका सांगण्यात येत आहे. कच्छ प्रदेशात खोल दाबाचे क्षेत्र चक्रीवादळाचे रूप धारण करण्याची शक्यता आहे. या मुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी झोपड्या आणि तात्पुरत्या घरांमध्ये राहणाऱ्यांना शाळा, मंदिर किंवा इतर इमारतींमध्ये आश्रय घेण्याचा सल्ला दिला आहे. 

 हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर, कच्छ जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अब्दासा, मांडवी आणि लखपत तालुक्यात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या झोपड्या आणि कच्ची घरे सोडून शाळा किंवा इतर इमारतींमध्ये आश्रय घेण्यास सांगणारा व्हिडिओ संदेश जारी केला. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत अशा गरीब लोकांना त्यांच्या घरात आसरा देण्यासाठी स्थानिक लोकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कच्छ आणि आसपासच्या भागात तयार झालेले खोल दाब येत्या 12 तासांत पश्चिमेकडे उत्तर-पूर्व अरबी समुद्राकडे सरकून चक्री वादळात बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या चक्रीवादळाला आसना असे नाव देण्यात येईल.असे सांगण्यात आले आहे. 

अरबी समुद्रात ऑगस्टमध्ये चक्रीवादळ निर्माण होणेही दुर्मिळ आहे."गुजरात किनारपट्टीवर 75 किमी प्रतितास वेगाने उंच लाटा आणि वाऱ्याचा वेग असल्याचे सांगण्यात येत आहे. 
Edited by - Priya Dixit