शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आता विमान प्रवाश्यासाठी ‘नो-फ्लाय लिस्ट’

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून नव्या नियमांची घोषणा करण्यात आली. यात बेशिस्त वर्तवणूक आणि कामकाजात अडथळे निर्माण प्रवाशांसाठी एक लिस्ट तयार केली आहे.  ही लिस्ट ‘नो-फ्लाय लिस्ट’ असे असेल. या ‘नो-फ्लाय लिस्ट’ ज्या प्रवाशांना टाकण्यात येईल, त्या प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करता येणार नाही. बेशिस्त वर्तवणूक आणि कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवाशांच्या कारवाईसाठी तीन प्रकारांमध्ये या लिस्टमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या प्रकारात आक्षेपार्ह हावभाव, दुसऱ्या प्रकारात ढकलणे, मारणे किंवा लैंगिक छळ यासारखी कृती तर तिसऱ्या प्रकारात जीवे मारण्याचा प्रयत्न यावरून शिक्षा निश्चित केली जाईल. त्यानुसार संबंधित प्रवाशांवर अनुक्रमे तीन महिने, सहा महिने आणि दोन वर्षांसाठी निर्बंध घालण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.