शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (17:00 IST)

अँजिओप्लास्टीसाठी स्टेंटच्या किमतीत जवळपास 85 टक्क्यांनी कपात

हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किमतीत जवळपास 85 टक्क्यांनी कपात करण्यात येत आहे. राष्ट्रीय फार्मास्युटिकल दर प्राधिकरणाने कमाल किमती निश्चित केल्या आहेत. बायोरिसॉर्बेबल स्टेंट्सची किंमत 30 हजार रुपये, तर बेअर मेटल स्टेंट्सची किंमत 7 हजार 500 रुपयांपर्यंत आकारण्याचं ठरवण्यात आलं आहे.यामुळे  अँजिओप्लास्टी करणाऱ्या रुग्णांना  निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये भारतात अंदाजे 6 लाख स्टेंट्सचा वापर अँजिओप्लास्टीमध्ये झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.