1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2023 (09:56 IST)

केंद्र सरकारचा रेशनकार्ड धारकांना मोठा धक्का, गहू आणि तांदूळ विक्रीवर घातली बंदी

Ration
केंद्र आणि राज्य सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असणार्‍यांसाठी ही बातमी फार मोठी आहे. केंद्र सरकारने रेशनबाबत मोठा निर्णय घेत राज्य सरकारांना तांदूळ आणि गव्हाची विक्री थांबवली आहे.
माहितीनुसार केंद्र सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत राज्य सरकारांना विक्री थांबवल्याने कर्नाटकसह काही राज्यांवर याचा परिणाम होणार आहे.
 
केंद्रातर्फे कर्नाटक सरकारला याबाबत आधीच माहिती देण्यात आली होती. भारतीय खाद्य महामंडळाने (FCI) जारी केलेल्या आदेशानुसार राज्य सरकारांना OMSS अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री बंद करण्यात आली आहे.
 
केंद्राने 31 मार्च 2024 पर्यंत गव्हावर स्टॉक मर्यादा लागू करत असताना खुल्या बाजारातील किंमत कमी करण्याच्या हेतूने OMSS अंतर्गत तांदूळ आणि गहू देण्याची घोषणा 12 जून रोजी केली होती. तसेच OMSS अंतर्गत 15 लाख टन गहू केंद्र सरकारकडून खाजगी व्यापारी आणि गहू उत्पादनांच्या उत्पादकांना ई-लिलावाद्वारे विकण्याचीही घोषणा केली गेली होती. 
 
Edited By- Priya Dixit