रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :गांधीनगर , शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (11:06 IST)

15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येकाला मिळणार घर

मोदी सरकार पुढील वर्षी 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अति शहा यांनी दिले. अहमदाबादमधील शिलाज येथील ओव्हरब्रिजच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.
 
शहा म्हणाले, भाजप सरकार देशाच ग्रामीण तसेच शहरी  भागात गृहनिर्माण प्रकल्प राबवित आहे. पुढील वर्षी 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी घर उपलब्ध करुन दिले जाईल, याचा मला विश्वास आहे. आतापर्यंत मोदी सरकारने 10 कोटींहून अधिक परवडणारी घरे उपलब्ध करुन दिली आहेत.
 
यावेळी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल घटनास्थळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे एक लाख रेल्वे क्रॉसिंग विलग करण्याचा निर्णय घेतला.
ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे त्याठिकाणी ओव्हरब्रिज उभारण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत राज्य सरकार 50 टक्के आणि केंद्र सरकार 50 टक्के खर्च करणार असून रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे.