बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पैशासाठी वृध्दांना करतात वाघाच्या हवाली

पीलिभीत- सरकारकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी घरातील वृद्ध व्यक्तींना जंगलातील वाघाच्या हवाली करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पीलिभीतमध्ये घडत आहे.
 
घरातील व्यक्ती मृत पावल्यास सरकारकडून लाखो रूपये नुकसानभरपाई मिळत असल्याने हा प्रकार घडत असल्याचा संशय वन विभागाच्या अधिकार्‍याने व्यक्त केला आहे. फेब्रुवारी 2016 पासून एकट्या माला जंगलात सात घटना घडल्या आहेत. वाघाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाल्यास सरकार त्या घरातील व्यक्तींना लाखो रूपये नुकसानभरपाईच्या नावाखाली देत आहे. यायाच गैरफायदा काही लोकांकडून घेण्यात येत असल्याचा संशय अधिकार्‍याने व्यक्त केला.
 
वाइल्ड क्राईम कंट्रोल ब्युरो चे केंद्रीय सरकारी एजन्सचीचे कलीम अतहर यांनी याबाबत संशय व्यक्त केला. वाघाच्या ह्ल्लयात मृत्युमुखी पडलेल्या परिसरात जाऊन अतहर यांनी चौकशी केली. प्रत्येक पीडित व्यक्तींची भेट घेऊन नागरिकांची चौकशी केल्यानंतर त्यांना हा संशय आला असून त्यांची आपला संशय अहवालात नमूद केला आहे.
 
1 जुलै रोजी 55 वर्षीय महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व्ही. के. सिंह यांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर त्यांना त्यात खरेपणा वाटला नाही. मृत महिलेचा मृतदेह जंगलापासून 1.5 किलोमीटर दूर होता त्यामुळे सिंह यांनी त्या महिलेच्या घरातील व्यक्तीचा नुकसानभरपाई दावा फेटाळून लावला.