रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (10:27 IST)

राजस्थानमध्ये शाळेतून परतणाऱ्या चार विद्यार्थिनींचा तलावात बुडून मृत्यू

water death
राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील डुंगला पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी शाळेतून परतणाऱ्या चार विद्यार्थिनींचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिलोडा गावात शाळेतून परतणाऱ्या चार विद्यार्थिनींपैकी एक विद्यार्थिनी तलावात घसरली आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तीन विद्यार्थिनीही पाण्यात पडल्या आणि चारही विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच तलाव खूप खोल होता. ज्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. 
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच या चार विद्यार्थिनींना तलावातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोस्टमोर्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Edited By- Dhanashri Naik