सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (12:55 IST)

मित्रानेच घात केला ! जेवणात गुंगीचे औषध मिसळून बलात्कार केला

26 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीवर तिच्या महाविद्यालयीन मित्राने बलात्कार केला.आरोपींनी पीडितेच्या जेवणात गुंगीचे औषधे मिसळून ही घटना घडवली. एवढेच नाही तर पीडितेने सांगितले की आरोपीने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील बनवला. ज्याचा वापर तो मुलीला ब्लॅकमेल करण्यासाठी करत होता.
 
घटना मध्य प्रदेशातील भोपाळच्या निशातपुरा भागातील आहे. 14 ऑगस्ट रोजी आरोपी ने महिलेला महाविद्यालयात सोडण्याची इच्छा दर्शवली. वाटेत त्याने काही खाण्यासाठी घेतले आणि त्यात गुंगीचे औषध मिसळले.ते खाऊन झाल्यावर महिलेला बेशुद्ध अवस्थेत आरोपीच्या भाड्याच्या घरात नेण्यात आले, जिथे तिच्यावर बलात्कार केला. सदर आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी या घटनेचे चित्रीकरणही केले.
 
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने कॉलेज सोडल्यानंतर थोड्याच वेळात काही खायला  घेण्यासाठी त्याची गाडी थांबवली. खायला घेतल्यानंतर त्याने जेवणात गुंगीचे औषध मिसळले,त्या महिलेला त्याबद्दल माहितीही नव्हती. आरोपी महिलेला त्याच्या राहत्या भाड्याच्या घरी घेऊन गेला जिथे त्याने बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओही बनवला.
 
घटनेनंतर आरोपींनी व्हिडिओ बनवून महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. सतत छळ केल्यावर ही महिला अलिराजपूर जिल्ह्यातील तिच्या पालकांच्या घरी गेली आणि त्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिचे पालक तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि अलिराजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
हे प्रकरण भोपाळच्या निशातपुरा पोलिस स्टेशनला हस्तांतरित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपीच्या भाड्याच्या घरावर छापे टाकण्यात आले, पण तो सापडला नाही.तो पसार झाल्याचे वृत्त समजले आहे.पोलिसांनी तपास सुरु केला आहे.