पेट्रोल टाकून बाईकच्या शोरूमला पेटवून पोलीस ठाण्यात जाऊन कबुली दिली
कर्नाटकातील कलबुर्गी येथे हुमनाबाद रोडवर असलेल्या दुचाकी शोरूमला भीषण आग लागली. या आगीत दुचाकी शो रूम चे मोठे नुकसान झाले आहे. या मध्ये उभ्या असलेल्या सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहे. काल सकाळी ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत होते मात्र खरे कारण काही औरच समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने तीन दिवसांपूर्वी ओला इलेक्ट्रिक बाईक खरेदी केली होती. बाईक मध्ये काही त्रुटी असल्याचे ग्राहकाने सांगितले मात्र त्याला शो रूम मधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हा ग्राहक दररोज आपली बाईक घेऊन शो रूम मध्ये जायचा. मंगळवारी देखील हा बाईक घेऊन गेला असता. शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. मात्र सत्य काही औरच होते.
या ग्राहकाने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन शोरूमला आग लावण्याचे कबूल केले आहे. त्याला शोरूम मधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संतापून त्याने काल सकाळी पेट्रोल शिंपडून शोरूमला आग लावली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Edited by - Priya Dixit