बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (16:04 IST)

निराशेतून नवोदित अभिनेत्रीची आत्महत्या

बॉलीवूडमध्ये अपेक्षित य़श न मिळाल्याने निराश झालेल्या एका मॉडेल व अभिनेत्रीने असलेल्या पर्ल पंजाबी (24) ने मुंबईत ओशिवरा लोखंडवाला येथे इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून तिने आयुष्य संपवले.
 
पर्लने काही महिन्यांपूर्वीच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ती मुंबईत आईबरोबर राहायची. पण सुरुवातीला तिला छोट्या भूमिका मिळाल्या. पण नंतर तिला काम मिळेनासे झाले होते. यामुळे तिचे मानसिक संतुलनही बिघडले होते. तिची चिडचिड व्हायची. आईबरोबरही तिचे पटत नव्हते. त्यांच्यात सतत वाद होत असत. गुरुवारी रात्रीही तिचे आईबरोबर कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर पर्ल रागातच इमारतीच्या गच्चीवर गेली. वॉचमन काही कामाकरता बाहेर गेल्याने गच्चीचा दरवाजाही उघडा होता. यामुळे पर्ल थेट गच्चीत गेली व तिने खाली उडी मारली.