बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

घातपात घडवण्याचा आयसिसचा इशारा

कुंभमेळा, त्रिशूर पूरम उत्सवांमध्ये प्रचंड गर्दी असते. त्याच पार्श्वभूमीवर या उत्सवांमध्ये घातपात घडवण्याचा इशारा आयसिसने दिला आहे.  एका ध्वनीफितीच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. भारतविरुद्ध युद्ध पुकारण्याची भाषादेखील यामध्ये करण्यात आली आहे. १० मिनिटांची ही ध्वनीफित मल्याळम भाषेतील आहे. सध्या ही ध्वनीफित व्हॉट्सअप, टेलिग्राम यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.
 
आयसिसकडून जारी करण्यात आलेल्या ध्वनीफितीतून चिथावणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करा. त्यांच्या जेवणात विष टाका. ट्रकचा वापर करा. कुंभमेळा, त्रिशूर पूरममध्ये ट्रक घुसवा. आयसिसकडून या मार्गांचा वापर जगभरात केला जात आहे,’ असे ध्वनीफितीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. यासोबतच यामध्ये लास वेगास हल्ल्याचाही उल्लेख आहे. ‘लास वेगासमध्ये आयसिसच्या एका समर्थकाने म्युझिक कॉन्सर्टमध्ये गोळीबार करुन अनेकांना ठार केले. तुम्ही किमान रेल्वे गाड्या रुळावरुन घसरण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. चाकूचा वापर करुन हल्ले करायला हवेत,’ अशी चिथावणी ध्वनीफितीतून देण्यात आली आहे.