सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मार्च 2024 (12:42 IST)

Karnataka:महिलेची वृद्ध सासऱ्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल!

karnataka news
social media
कर्नाटकातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. मंगळुरू येथे एका महिलेने आपल्या वृद्ध सासऱ्याला  काठीने बेदम मारहाण केली आहे. ज्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर लोक महिलेवर कठोर कारवाई आणि पीडित वृद्धला न्याय देण्याची मागणी करत आहेत.

ही घटना मंगळुरूच्या कुलशेखर परिसरात घडली. 87 वर्षीय पद्मनाभ सुवर्णा असे पीडित महिलेचे नाव आहे. तर उमा शंकरी असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 9 मार्च रोजी घडली असून यामध्ये वृद्ध गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी उमा शंकरी सध्या एका कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पोलिसांनी पीडितच्या मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखसल करून आरोपी महिलेला अटक केली आहे. पीडित पदमनाभ यांचा मुलगा परदेशात कामाला आहे. 
 
Edited by - Priya Dixit