शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (11:59 IST)

लग्नसमारंभात मोठी दुर्घटना,3 जणांचा मृत्यू, 5 जखमी

बिहारच्या छपरा मध्ये एका भीषण अपघाताने लग्नाच्या आनंदात विरझण पडले. राज्यातील छपरा जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला असून त्यात विवाह समारंभात विधी करत असलेल्या महिलांना एका अनियंत्रित ट्रकने चिरडले. या अपघातात3 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त लोकांनी रास्ता रोको केला.
 
 मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात शुक्रवारी रात्री छपरा येथील मशरक पोलीस स्टेशन हद्दीतील दुमदुमा शिव मंदिराजवळ घडला . रस्त्याच्या कडेला (डोमकच) लग्नाच्या विधी साठी अनेक महिला विवाह सोहळा पार पाडत असताना एका ट्रकने अनियंत्रित होऊन महिलांना धडक दिली. काही वेळातच घटनास्थळी आरडाओरडा झाला. या अपघातानंतर लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले.
 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर जखमी महिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सदर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, गावात लुकमान हुसैन यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला होता. त्याचवेळी सिवानकडून येणाऱ्या अज्ञात ट्रकने महिलांना पायदळी तुडवले. यामध्ये 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाल्या. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.