गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (16:26 IST)

जॉब दो.. मोदी सरकार जवाब दो… आंदोलन

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आंदोलन केले. जॉब दो.. मोदी सरकार जवाब दो… राष्ट्रवादीची एकच पुकार जॉब दो… ये आझादी झुठी है… ये सरकार बदलनी है…अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कारकीर्दीत देशातील बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. बेरोजगारीने गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक दराची नोंदही केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रात सरकारविरोधी आंदोलन छेडले आहे. त्याची सुरुवात आज मुंबईतील प्रदेश कार्यालयापासून करण्यात आली. मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. राष्ट्रवादीने हे आंदोलन सोशल मिडियावर सुद्धा नेले असून त्यामुळे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोबतच सरकारच्या रोजगाराच्या विषयांवर राष्ट्रवादीने जोरदार टीका केली आहे.