मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (13:54 IST)

आज अमित शहांची भेट घेणार नारायण राणे

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे आज भाजपत प्रवेश करतील, अशा चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. आज दिल्लीत जाऊन राणे भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर नारायण राणे हे अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे समजते आहे. नारायण राणे हे सिंधुदुर्गातील रुग्णालयाच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्याच्या निमित्ताने अमित शहांना भेटणार आहेत.
 
दरम्यान, भाजपची विचारधारा स्वीकारणाऱ्यांचं स्वागत असेल, असे मत भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी व्यक्त केले आहे. अमित शहा यांच्यासोबत राणेंची बैठक झाल्यानंतर अधिक माहिती देऊ, असेही सरोज पांडे म्हणाल्या. नारायण राणे यांनी नुकताच काँग्रेसला रामराम केला आहे. त्यामुळे ते एकतर नवीन पक्षाची स्थापना करतील किंवा भाजपात जातील, अशी शक्य
ता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा आणि नारायण राणे यांच्या भेटीने आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळालं आहे.