भाजपचा सिद्धू आता काँग्रेस कडून लढवणार निवडणूक
पंजाबमध्ये माजी क्रिकेटर आणि टीव्ही पर्सनालीटी असलेले नवज्योतसिंह सिद्धू यांचा मोठा निर्णय झाला असून ते काँग्रेस कडून निवडणूक लढविणार आहे.भाजपला सोडल्यावर सिद्धू आता पंजाबमध्ये काँग्रेच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सिद्धू त्याची पत्नी नवजोत कौरचा मतदारसंघ अमृतसर ईस्टमधून निवडणूक लढवणार आहे. सध्या सिद्धूची पत्नी या मतदारसंघाची आमदार आहे. मात्र नवजोत कौर निवडणूक लढवणार नाही. नवजोत सिद्धूने गेल्या वर्षीच भाजपचा राजीनामा दिला होता. भाजपातील अंतर्गत कलह आणि इतर मागण्यामुळे सिद्धू ने पक्ष सोडला होता. यामुळे भाजपाला मोठा फटका पंजाब मध्ये बसणार आहे.