मंगळवार, 10 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 जून 2023 (18:24 IST)

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288, पंतप्रधानांची घटनास्थळी धाव , ओडिशा रेल्वे अपघातात रुग्णालयात जखमींची भेट घेतली

social media
Odisha Train Accident  : ओडिशामध्ये शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. त्याच वेळी सुमारे 850 लोक जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जखमी रुग्णांची भेट घेतली.
 
काल ओडिशाच्या बालासोर मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या 288 झाली असून गेल्या 20 वर्षात भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात झाला आहे. या अपघातात तीन ट्रेंनांची एकमेकांना भीषण धडक झाली आहे. अपघातात जखमी रुग्णांची पंत प्रधान मोदी यांनी भेट घेतली. पंत प्रधान मोदींनी अपघातस्थळी सुरु असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक अधिकारी, आपत्ती निवारण दलाचे कर्मचारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आणि जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना दिल्या. 
या अपघातात रेल्वेची धडक एवढी भीषण होती. की काही डबे हवेत उडाले. या अपघातात 288 लोक मृत्युमुखी झाले आहे तर 900 पेक्षा अधिक जखमी झाले आहे. 
 
रुग्णालयात पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना ते म्हणाले की, ज्यांना जीव गमवावा लागला त्यांच्यासाठी हे खूप दुःखदायक आहे. जे जखमी झाले आहेत त्यांच्या आरोग्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. ही एक गंभीर घटना आहे. सर्व प्रकारच्या चाचण्या घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना सोडले जाणार नाही. यावेळी त्यांनी रेल्वे, ओडिशा सरकार आणि स्थानिक लोकांचे उपलब्ध साधनांसह बचाव कार्य चालवल्याबद्दल आभार मानले. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असे ते म्हणाले. या दुःखाच्या वेळी आपण सर्वांनी प्रार्थना करूया, जेणेकरून आपण त्यावर मात करू शकू. आम्ही मृतांच्या कुटुंबियांसोबत आहोत. 
 
Edited by - Priya Dixit