धनाढ्य नाही तर महा-धनाढ्य भाजपाचा उमेदवार
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत घाटकोपरच्या एन वॉर्डची निवडणूक धनाढ्य उमेदवारांची निवडणूक आहे. भाजपचे उमेदवार पराग शाह हे देखील भाजपचे उमेदवार असून ते अब्जाधीश उमेदवार आहेत. तर व्यावसायिक असलेले पराग शाह हे प्रभाग क्रमांक 132 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नगरसेवकपदासाठी उतरलेल्या शाह यांच्याकडे एखाद्या खासदार, आमदारालाही किंबहुना व्यवसाईकला शर्म वाटेल इतकी संपत्ती आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शाह यांच्याकडे 689 कोटी 95 लाख 2 हजार 327 रुपये इतकी प्रचंड संपत्ती आहे.या भागात गुजराती मतदार आहेत. या प्रभागात शिवसेनेने सुधाकर पाटील, तर कॉंग्रेसने प्रवीण छेडांनी उमेदवारी दिली आहे.