गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 22 जुलै 2017 (09:41 IST)

काश्मीर वादात तिस-या पक्षकाराचा हस्तक्षेप नको : राहुल गांधी

काश्मीर म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच काश्मीर, असं म्हणत राहुल गांधी यांनी चीन आणि पाकिस्तानच्या सुरू असलेल्या गुप्त चर्चांवर टीका केलीय. काश्मीरच्या वादात कोणत्याही तिस-या पक्षकारानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असंही राहुल गांधींनी चीनला ठणकावून सांगितलंय.

राहुल गांधी यांनी या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केलीय. मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे काश्मीरमध्ये हिंसाचार वाढला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर चीन आणि पाकिस्तानमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे. मात्र माझ्या दृष्टिकोनातून हा भारताचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्यात त्रयस्थ देशानं पडण्याची गरज नाही, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी काश्मीरमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचाराला भाजपा आणि एनडीए सरकारला जबाबदार धरलं आहे. नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या चुकीच्या धोरणांमुळेच काश्मीर धुमसतंय, असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.