रस्ता अपघात,कारची ऑटोला धडक; वधू-वरांसह सात जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. रस्ता अपघातात वधू-वरांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिजनौर जिल्ह्यातील धामपूर पोलीस ठाण्याच्या हरिद्वार-काशीपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अग्निशमन केंद्राजवळ शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. दाट धुक्यामुळे कारने ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात वधू-वरांसह सात जणांचा मृत्यू झाला. मृत तरुण धामापूरच्या तिबरी गावचा रहिवासी आहे.
या अपघातात चार पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वधू-वर, वराची मावशी, वराचा भाऊ आणि ऑटोचालकासह सात जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्ताचे कुटुंब झारखंडमधून लग्न आटोपून मुरादाबादला आले होते. तेथून घरी येण्यासाठी ऑटो बुक केला होता.
हरिद्वार-काशीपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अग्निशमन केंद्राजवळ ऑटो पोहोचताच. गाडीला धडक दिली. अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
Edited By - Priya Dixit