गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (11:03 IST)

800 रुपये किलो भेंडी, इतकी महाग का? जाणून घ्या

आतापर्यंत तुम्ही बहुधा हिरव्या रंगाची भेंडी पाहिली असेल. परंतु मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील मिश्रीलाल राजपूत या शेतकऱ्याने आपल्या शेतात लाल भेंडी उगवली आहे. ही भिंडी हिरव्या भेंडीपेक्षा खूप वेगळी आहे. याचा केवळ रंगच वेगळा नाही, तर त्याची किंमत आणि पौष्टिक मूल्य देखील हिरव्या भेंडीच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त आहे. शेतकरी मिश्रीलाल यांनी सांगितले की लाल भिंडी मॉलमध्ये सुमारे 700-800 रुपये प्रति किलो विकले जाईल. लाल भेंडी सामान्य भेंडीपेक्षा कित्येक पटीने महाग विकली जात आहे.
 
उत्पादन आणि किंमतीवर खूश मिश्रीलाल यांनी सांगितले की लाल भेंडीमध्ये काय खास आहे. ही भेंडी बाजारात इतकी महाग का विकली जात आहे हेही त्याने सांगितले.
 
लाल भेंडी हिरव्या भेंडीपेक्षा अधिक पौष्टिक आहे. हृदयरोग किंवा रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी लाल भेंडी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. या व्यतिरिक्त, ज्यांना मधुमेह किंवा उच्च कोलेस्टेरॉलची समस्या आहे त्यांच्यासाठी ही भेंडी खूप चांगली मानली जाते.
 
भेंडी उत्पादनाच्या प्रक्रियेबाबत शेतकरी म्हणाला, "मी या भेंडीचे बियाणे वाराणसीच्या कृषी संशोधन संस्थेकडून विकत घेतले होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झाली. सुमारे 40 दिवसांनंतर, भेंडीचे पीक तयार झाले आणि बाजारात आले.
 
मिश्रीलाल राजपूत यांनी असेही सांगितले की त्याच्या लागवडीत कोणतेही हानिकारक कीटकनाशक टाकले गेले नाही. पिकांच्या उत्पन्नाबाबत ते म्हणाले की, एका एकरात कमीतकमी 40-50 क्विंटल ते 70-80 क्विंटल भेंडीची लागवड करता येते.