मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 जानेवारी 2020 (12:58 IST)

निर्भया प्रकरणः मुकेशची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली

दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावल्याने आता दोषी मुकेशच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रपतींनी मुकेशची दया याचिका फेटाळून लावली होती, याविरोधात मुकेशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
 
निर्भया प्रकरणातील चार आरोपींपैकी एक मुकेशने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. परंतु राष्ट्रपतींनी त्याची दया याचिका फेटाळून लावली होती. याचा न्यायिक तपास करण्यात यावा, अशी मागणी करीत मुकेशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. दया याचिका फेटाळण्यात घाई करण्यात आली असा दावा मुकेशने याचिकेतून केला होता. 
 
निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यासाठी 1 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली असून सकाळी 6 वाजता चौघांनाही फाशी देण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.