देशातील 7 विमानतळांवर आता लागणार नाही बॅगेला टॅग
देशातील 7 मोठे विमानतळ नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद येथे गुरुवारपासून हँडबॅगला सुरक्षा टॅग लागणार नाही. प्रवाशांच्या बॅगेला टॅग न लावण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला आहे.
सीआयएसएफ महानिदेशक ओपी सिंग यांनी म्हटले की बॅगेवर टॅग लावण्याची प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आमच्या येथे बोर्डिग पासवर शिक्का आणि बॅगेवर टॅग लावण्याची प्रक्रिया 1992 पासून आहे. जी केवळ भारतातच आहे.
प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही बॅगेला स्टॅम्पिंग टॅग न लावण्याचे ठरवले आहे. गुरुवारपासून हा प्रयोग काही विमानतळांवर सुरू करीत आहोत. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मग हीच पद्धत कायम केली जाईल, असे सिंग यांनी सांगितले.