सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (19:13 IST)

शाळेच्या सहलीत शिक्षिका-विद्यार्थ्याचे रोमँटिक फोटोशूट लीक

love hands
शाळेची सहल म्हटली की मस्ती मजा होते. बसमध्ये सगळे एकत्र येण्याचा मज्जा काही औरच असतो. शाळेच्या सहलीत मुख्याध्यापक, शिक्षकांवर मुलांची मोठी जबादारी असते. शिस्तभंग होऊ नये या साठी शिक्षकांवर मुलांना शिस्त लावण्याचे बंधन असते. अनेकदा मुलांचे सहलीचे फोटो देखील सोशल मिडीयावर व्हायरल होतात. आता सोशल मीडिया वर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहलीतील आगळेवेगळे फोटो व्हायरल झाले आहे या फोटोत विद्यार्थी आणि शिक्षिका रोमँटिक पोज मध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मुख्याध्यापिकेला किस करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यावर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  

रिपोर्टनुसार, कर्नाटकाच्या चिंतामणी तालुक्यात मुरुगामल्ला गावातील एका सरकारी शाळेची सहल गेली असताना शाळेतील  मुख्याध्यापिकेने sslc मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह अनुचित वर्तन केले. तिने मोबाईलवर रोमँटिक फोटो काढल्याचे समजले आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी शिक्षिकेचे चुंबन घेत असून तिला मिठी मारत असताना तिचा पदर ओढताना दिसत आहे.  

हे फोटो व्हायरल झाल्यावर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या शिक्षिकेच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पालक करत आहे. अद्याप शाळेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.  

Edited By- Priya Dixit