शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 23 मे 2021 (17:24 IST)

यास' चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल सज्ज

विशाखापट्टणम. देशाच्या पूर्वेकडील किनाऱ्यापट्टीवर 'येस' चक्रीवादळामुळे उद्भवू शकणार्‍या संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी भारतीय तटरक्षक दल करीत आहे.
शनिवारी तटरक्षक दलाने दिलेल्या निवेदनानुसार, भारतीय हवामान खात्याने सांगितले की उत्तर अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या खाडी मध्ये 22 मे रोजी तयार झालेला कमी दबाव क्षेत्र 24 मे पर्यंत चक्रीवादळ तुफानचे रूप घेऊ शकतो. 
 
यास चक्रीवादळ उत्तर-पश्चिमे दिशेने पूढे जाईल आणि 26 मे पर्यंत ओडिशा-पश्चिम बंगालला पोहोचेल. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोस्ट गार्ड ईस्टर्न सीबोर्डाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. ईस्टर्न सीबोर्ड मध्ये कोस्ट गार्ड स्टेशन, जहाजे आणि विमाने हाय अलर्टवर आहेत.
त्याचबरोबर कोलकाता पोर्ट ट्रस्ट (श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट) देखील पश्चिम बंगालमधील चक्रीवादळाची तयारी करत आहे. मालमत्ता, जहाज आणि इतर मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी बंदरात पुरेशी व्यवस्था केली जात आहे.
बंदर अध्यक्ष विनीत कुमार म्हणाले की, चक्रीवादळ येथे पोहोचण्यापूर्वी सर्व  जहाजावर अँकर घातले गेले पाहिजेत आणि नदीच्या पात्रात कोणते ही जहाज शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी असे बंदर अधिकाऱ्यांना  सांगण्यात आले आहे. कोलकाता डॉक सिस्टम आणि हल्दिया डॉक सिस्टम कॉम्प्लेक्स येथे नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत.