रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑगस्ट 2024 (18:05 IST)

अजगराला पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाला अजगराने विळखा घातला,सुदैवाने जीव वाचला

बिहारच्या गोपालगंजच्या नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरखूआ गावाजवळ सारण मुख्य गण्डक कालव्याजवळ एक भलामोठा अजगर रस्त्यावर फिरत होता. अजगराला पाहून नागरिकांमध्ये घबराहट पसरली. अजगराला पकडण्यासाठी एक तरुण पुढे आला आणि त्याने अजगराला पकडण्यास सुरु केले. अजगराने त्याचा हाताला विळखा घालत हाताला चावा घेतला. त्याने हिम्मत राखत अजगराचं तोंडच पकडलं 

या घटनेची महिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्यावेळी देखील त्याने अजगराचं तोंड धरलं होत. डॉक्टरांनी त्याला अजगराला बाहेर ठेवायला सांगितल्यावर त्याने अजगराला बाहेर ठेवले.

अजगर रुग्णालयाच्या आवारात फिरू लागल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. लोकांनी त्याचा व्हिदिओ बनवायला सुरु केले. वनविभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अजगराला पकडले. तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तो सध्या धोक्याच्या बाहेर आहे. 
Edited by - Priya Dixit