रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

होशंगाबादमध्ये कुत्र्यांसाठी शौचालय!

होशंगाबाद- मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे नगर पालिका परिषद द्वारे शहरात कुत्र्यांसाठी शौचालय निर्मित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
नगर पालिका अध्यक्ष अखिलेश खण्डेलवाल यांनी सांगितले की पीआयसी बैठकीत शौचालय निर्माण करण्याचा प्रस्ताव पास झाला आहे. सर्वप्रथम शहरात दोन जागी शौचालय निर्माण करण्यात येतील. त्यांनी सांगितले की यासाठी जागेची निवड झाली असून 31 डिसेंबरपर्यंत शौचालय निर्माण कार्य पूर्ण करण्याची योजना आहे.